गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. गुढीपाडव्याच्या दिवसांपासून चैत्र मासारंभ सुरू होते. चैत्र मास हा हिंदू दिनदर्शिकेतील पहिला महिना असतो. यावर्षी म्हणजेच 2022 पासून शके 1944 हिंदू वर्षाची सुरुवात होते आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. गुढीपाडव्याच्या दिवसांपासून चैत्र मासारंभ सुरू होते. चैत्र मास हा हिंदू दिनदर्शिकेतील पहिला महिना असतो. यावर्षी म्हणजेच 2022 पासून शके 1944 हिंदू वर्षाची सुरुवात होते आहे.
गुढीपाडवा गुढी’ या शब्दाचा अर्थ ‘विजय ध्वज’ आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. या दिवशी मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. गुढीपाडव्याच्या दिवसांपासून चैत्र मासारंभ सुरू होते. चैत्र मास हा हिंदू दिनदर्शिकेतील पहिला महिना असतो. यावर्षी म्हणजेच 2022 पासून शके 1944 हिंदू वर्षाची सुरुवात होते आहे. या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर स्त्रिया विजयाचे प्रतीक म्हणून घरामध्ये सुंदर गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात. असे मानले जाते की यामुळे तिथली नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख-समृद्धी येते. असे म्हणतात की या दिवशी प्रभू श्रीरामाने बळीचा वध केला तेव्हा लोकांनी आनंद म्हणून घरोघरी रांगोळी काढली आणि घरोघरी विजयाची पताका फडकावली.
गुढी कशी उभारावी ? आदल्या दिवशीच किंवा आठवडा अगोदर लांब बांबू ( गरजेनुसार )विकत आणून ठेवा , सकाळी लवकर उठून बांबू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि आंब्याचा टाळ, कडूलिंबाची फांदी, चाफ्याची, सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा गडू, तांब्या किंवा फुलपात्र अडकवावे.नंतर सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुढी उभारावी. गुढीच्या खाली बसायचा पाट ठेवायचा. काही ठिकाणी गुढीच्या पायथ्याशी नारळ सुद्धा बसवतात. गुढीला धर्मशास्त्रात ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे. यानंतर मनोभावे पूजा करा.
यावर्षीचा गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त : तसं पाहायला गेलं तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे , त्यामुळे पुर्ण दिवसच शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या तिथिची सुरुवात प्रतिपदा तिथी शुक्रवार, 01 एप्रिल रोजी सकाळी 11.53 पासून सुरू होईल आणि दुसर्या दिवशी, 02 एप्रिल, शनिवारी रात्री 11.58 पर्यंत राहील.तिथीनुसार हा उत्सव 02 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहेत. हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.
विशेष महत्त्व
- साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त.
- अतिशय शुभ दिवस
- नवीन कार्याची सुरुवात करावी
- लोक सोनं खरेदी करतात
- नवीन वास्तू खरेदीसाठी शुभ मुहूर्त
- एकमेकांना नवीन वर्षाचा शुभेच्छा देतात.
- मराठी नवीन वर्षाची सुरुवात, शके 1944
- ग्रृहप्रवेश करण्यासाठी शुभ मुहूर्त/ दिवस

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा