Benefits of drinking 'Earthenware pot' water in summer | उन्हाळ्यामध्ये माठातले पाणी पिण्याचे फायदे
आता मार्च महिना संपला, त्यात हवामान बदलामुळे दरवर्षी 1 अंश तापमान वाढत आहे. एप्रिल महिन्यात आता सगळीकडेच उन्हामुळे वातावरण उष्ण होत आहे. आता एप्रिल महिन्यात सगळीकडेच उन्हाच्या झळा बसायला लागल्या कि प्रत्येकाला अगदी नकोसा होईल, याचबरोबर उन्हाचे त्रास सुद्धा वाढू लागतील, त्यामुळे आता प्रत्येकाने आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे !
या कडक उन्हात सगळ्यांना काहीतरी थंड खावं किंवा प्यावसं वाटत असतं! मग त्यात सरबत, लस्सी, गोळा,कोकम सरबत, आईस्क्रीम असे वेगवेगळे प्रकार सगळ्यांनाच खावेसे वाटतात! त्याहूनही अधिक आवडणारी गोष्ट म्हणजे फ्रिजमधले थंड गार पाणी, उन्हाळयात जेंव्हा तुम्ही बाहेरून थकून येता तेंव्हा तुम्हाला मस्त कुल/चिल्ड पाणी प्यायची इच्छा होते!
पण हे थंड पाणी तुमच्या शरीराला किती घातक असते याची बहुदा तुम्हाला कल्पना नसेल !
या अशा वेळी फ्रिज मधलं थंड पाणी न पिता दुसरे कोणते पर्यायी उपाय करता येतील ज्याने तहान पण भागेल आणि समाधान पण होईल ?
या अशावेळेस आपल्या उपयोगी येतो तो म्हणजे 'मातीचा मडका' म्हणजेच 'मातीचा माठ' माठातलं पाणी प्यायल्यावर जी क्षुधा शांती होते ती फ्रीजमधल्या पाण्याने होत नाही.
फायदे:
- माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्यसमस्या होत नाही.
- ज्या लोकांना सर्दी, खोकला आणि अस्थमाचा त्रास असतो, त्यांना फ्रिजमधील थंड पाणी वर्ज्य केले जाते. अशावेळी माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते. मातीच्या माठाला लहान लहान छिद्र असतात, त्यामुळे त्याच्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होत असते.त्यामुळे हा पाणी प्यायल्याने नैसर्गिक थंडावा देखील मिळतो.
- प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ‘बीपीए’ नावाचे हानिकारक केमिकल असते, ज्याचा परिणाम आरोग्यावर विपरित होतो. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.
- माठातील पाणी हे तुम्ही एकदा माठ विकत घेतला की, एक पैसाही खर्च न करता गार करू शकता. माठाला छोटी छोटी छिद्र असतात ती आपल्याला डोळ्यांनी दिसतही नाहीत. पाणी बाष्पीकरणामुळे पाणी थंड होते. जितके बाष्पीकरण जास्त होते तेवढे पाणी जास्त थंड होते. म्हणूनच माठाच्या खाली पाणी झिरपत असतो.
- उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी उपयुक्त ठरते. ते.
- माठातील पाणी गर्भवती महिला किंवा लहान मुले सुद्धा पिऊ शकतात. त्यांनी माठातील पाणी प्यायले तर त्यांना काही त्रास होत नाही.
- शिवाय पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केल्याने टाकाऊ बाटल्यांमुळे पर्यावरण प्रदुषण होते. आपल्याला या प्लास्टिकच्या बाटल्या समुद्रात, समुद्र किनारी, रस्त्यावर पडलेल्या दिसतात.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा