SBI Launch new toll free number service | SBI मध्ये तुमचेही खाते असेल तर ही बातमी वाचाच… ग्राहकांसाठी खुशखबर!

SBI मध्ये तुमचेही खाते असेल तर ही बातमी वाचाच… ग्राहकांसाठी खुशखबर!

 

स्टेट बँक ऑफ इंडियाने १८०० १२३४ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त एका कॉल आणि मेसेजद्वारे घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. बँकेनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

SBI Toll Free Number जारी केला आहे : स्टेट बँक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर आता बँक तुम्हाला एका नंबरवर कॉल किंवा मेसेज करून घरी बसून अनेक सुविधा देत आहे. तुम्हीही तो नंबर लगेच तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा‌ आणि घरच्या घरी सेवा मिळवा

या एका नंबरने अनेक गोष्टी पूर्ण होतील स्टेट बँक ऑफ इंडियाने १८०० १२३४ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त एका कॉल आणि मेसेजद्वारे घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. बँकेनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने सांगितले आहे की फक्त एका नंबरद्वारे तुमचे सर्व महत्त्वाचे काम काही मिनिटांत होईल.

एसबीआयने ट्विट करून माहिती दिली स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमच्या घरी सुरक्षित रहा. आम्ही तुम्हाला तुमच्या दारात बँकिंग सुविधा देत आहोत. SBI सर्व आवश्यक बँकिंग सुविधा तुमच्या दारात पोहोचवत आहे.

या टोलफ्री नंबरवर कॉल करा ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १८०० १२३४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. या नंबरवर कॉल करून तुम्हाला अनेक सुविधा मिळू शकतात. तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून तुम्ही घरी बसून कोणत्या सुविधांचा लाभ घेऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

SBI टोल फ्री क्रमांक- तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या शेवटच्या 5 व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमची शिल्लक आणि शेवटचे ५ व्यवहार एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही एटीएम कार्ड ब्लॉक आणि जारी करण्याची विनंती देखील करू शकता.

ATM ब्लॉक किंवा नवीन ATM मागवू शकतो तुम्ही घरी बसल्या बसल्या एटीएमचा ग्रीन पिन तयार करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचे जुने चालू हरवलेलं एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर नवीन एटीएम कार्ड जारी करण्यासाठी अर्ज करू शकता.

वैशिष्ट्ये

  1. शेवटच्या 5 व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता.
  2. ATM ब्लॉक किंवा नवीन ATM मागवू शकतो
  3. खाते शिल्लक मागवू शकतो

Tags :
SBI MISSED CALL SBI MISSED CALL BALANCE SBI MISSED CALL BANKING SBI MISSED CALL CHECK BALANCE SBI MISSED CALL BALANCE CHECK SBI MISSED CALL NUMBER SBI NEW NUMBER SBI 18001234 SERVICE

टिप्पण्या