मोबाइल मधील डिफॉल्ट ॲप जे मी कधीच वापरत नाही, ते जर काढून टाकायचे असतील तर कसे काढावेत ?

Post Edit करायची आहे.......

फुल डिटेल्स टाकायची आहे...

कृपया पुन्हा  visit करा....



ज्या ॲप्सना सेटिंग मध्ये 'डिलीट' हा पर्याय न येता डिसेबल/disable असा पर्याय असतो ते सर्व ॲप्स system app असतात. ( सिस्टीम पार्टिशन मध्ये असतात / read only memory मध्ये)  तुम्ही जे डिफॉल्ट ॲप म्हणता त्याना मी/आपण सिस्टीम ॲप मानु.


हल्ली नवीन मोबाईल मध्ये अमेझॉन, फ्लिपकार्ट, फेसबुक आणि बरेच ॲप सिस्टीम ॲप म्हणून येतात. हे ॲप आपण वापरत नसलो तरी ते बॅकग्राऊंड मध्ये चालू असतात आणि हे RAM, processor, battery 🔋 वापरतात. या ॲप्सना डिसेबल/disable करायचे , जेणेकरून ते RAM, processor, battery असा फोनचा महत्त्वपूर्ण संसाधन वापरणार नाही ( ॲप डिसेबल/disable केल्यावर तो फोनमध्ये कायमचा बंद होतो RAM, processor, battery काही खात नाही. )


दोन प्रकार करू शकतो :

१) अनधिकृत मार्ग (unofficial way)

२) अधिकृत मार्ग (official way)


१) यासाठी तुमचा मोबाईल root करावा लागेल. मोबाईल root केल्यास आपल्याकडे /system/app या फोल्डर मध्ये बदल करण्याची परवानगी मिळते ( read only memory मध्ये बदल करण्याची परवानगी ). root केल्यावर तुम्ही कोणताही system app permanently उडवू शकता. अगदी फोन रिसेट / फॉरमॅट केला तरी डिलीट केलेले ॲप पुन्हा येत नाही. तसेच root केल्यास साध्या ॲपला आपण सिस्टीम ॲप करु शकतो.


१ पर्यायासाठी टिप : मोबाईल नवीन असेल तर root केल्यास वॉरंटी संपते. सर्वच फोन root होत नाहीत. Root करण्यासाठी प्रत्येक ब्रॅण्ड साठी वेगवेगळ्या पायऱ्या असतात. हा खुप धोकादायक मार्ग आहे.


२) आपण अधिकृतपणे सिस्टीम ॲप permanently/कायमचे डिलीट करू शकत नाही पण डिसेबल करू शकतो. पण काही ॲप्सचा डिसेबल/disable हा पर्याय गडद/grey out झालेला असतो. अशे ॲप फक्त फोनमधून डिसेबल करणे अशक्य आहे. पण आपल्याकडे कंप्युटर असेल तर आपण अशा कोणत्याही ॲपला डिसेबल करू शकतो.


अ) कंप्युटर वरील पर्याय:

पुर्वतयारी = कंप्युटर मध्ये adb driver + adb fastboot tool install करा.

फोनमध्ये डेव्हलपर पर्याय चालू करा आणि adb debugging हा पर्याय अॉन करा

आता मोबाईल usb ने कंप्युटरला जोडा आणि पुढील adb command टाईप करून enter मारा.

adb shell pm disable-user --user 0 com.miui.cleanmaster

adb shell pm disable-user --user 0 com.miui.cleanmaster

Enter मारताच mi phone मधून क्लिनमास्टर डिसेबल होईल.प्रत्येक ॲपला एक पॅकेज नाव असतो जसे क्रोमला com.android,chrome तो पॅकेज नाव वापरायचा आहे.

या पर्यायात फोनची वॉरंटी जात नाही तसेच हा मार्ग शुन्य टक्के धोकादायक आहे. फोन रिसेट फॉरमॅट केला कि ॲप पुन्हा येणार.

पहीले जुन्या android version मध्ये system app काढून टाकणे अवघड होते पण android 12 अपडेट मध्ये तुम्ही बहुतेक सर्व/ कोणताही ॲप डिसेबल करु शकता



टिप्पण्या